दीपोत्सवासाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:30+5:30

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथिलता दिली आहे. महाविदयालय, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृह व ॲम्युझमेंट पार्क, खेळाडूंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात १७ लाख ५२ हजार ३३४ नागरिकांना डोस देण्यात आले. 

Sajli Bazaar for Dipotsava | दीपोत्सवासाठी सजली बाजारपेठ

दीपोत्सवासाठी सजली बाजारपेठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच निर्बंध हटविल्याने नागरिक आता जीवनाच्या सर्वच क्षेत्रात संचार करीत आहेत. मात्र, दिवाळीची खरेदी करताना बेफिकीरपणा केल्यास आरोग्यासाठी घातक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून दिवाळीतील गर्दी ही कोविड संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी घेत आहेत. नागरिक व व्यावसायिकांनी गंभीरतेने प्रशासनाच्या सूचनांना गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आहे.
शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथिलता दिली आहे. महाविदयालय, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृह व ॲम्युझमेंट पार्क, खेळाडूंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात १७ लाख ५२ हजार ३३४ नागरिकांना डोस देण्यात आले. 
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य  यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच दिवाळी        सणासुदीची खरेदी करावी, असे आवाहन केले.  

 वाहनांची आगाऊ नोंदणी
केंद्र सरकारने नवीन वाहनांच्या विम्याबाबतचे नियम बदलल्याने विक्री  घटली होती. दिवाळी दरम्यान चित्र बदलण्याचा अंदाज आहे. अनेकांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी केली. रिअल इस्टेटमधील मरगळ अजूनही दूर झाली नाही. त्यामुळे या क्षेत्रात उदासिनता आहे.

इलेक्ट्रॉनिक्सचे स्मार्टनेस
दिवाळीसाठी चंद्रपुरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन इलेक्ट्रॉनिक्स माल खरेदी केला. या बाजारात थोडी तेजी दिसून येत आहे. एसी, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन विकत घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. ग्राहकांना खेचून घेण्यासाठी दुकानदारांनी अनेक सवलती देण्याची तयारी चालविली आहे.  कोरोना संसर्ग कमी झाल्याचे पाहून कर्जपुरवठा कंपन्याही सरसावल्या. सध्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी नसली तरी दुकानदार नवीन माल भरत आहेत.

बाजारात वाढली गुंतवणूक
कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल, सराफा, फर्निचर क्षेत्रांत व्यावसायिकांनी गुंतवणूक केली. सराफा बाजारातही सध्या चैतन्य दिसून येत आहे. कापड बाजारातही नवीन माल उपलब्ध झाला. ऑनलाईन खरेदीकडे कल असला तरी यंदा कापड बाजारात चांगला व्यवसाय होऊ शकतो. या आठवड्याच्या अखेरीस गर्दीसाठी मोठी गर्दी होऊ शकते.

 

Web Title: Sajli Bazaar for Dipotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.