विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण पथक पोहोचले महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:34+5:30

शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालयांत  मिशन युवा स्वास्थ्य  मोहिमेतंर्गत लसीकरण शिबिर होणार आहेत.

Kovid vaccination team for students reached the college | विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण पथक पोहोचले महाविद्यालयात

विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण पथक पोहोचले महाविद्यालयात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपातर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थायी लसीकरण केंद्रांसोबतच ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच मालिकेत मंगळवारपासून सोमय्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण’ मोहिमेचा प्रारंभ उपमहापौर राहुल पावडे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी, डॉ. अश्विनी येडे व सोमय्या पॉलिटेक्निकचे मुख्याध्यापक प्रा. मोहम्मद जमीर शेख आदी उपस्थित होते.
शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालयांत  मिशन युवा स्वास्थ्य  मोहिमेतंर्गत लसीकरण शिबिर होणार आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून महारथी कर्णाच्या अभेद्य कवचकुंडलांचा दाखला विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर पावडे लसीकरण कामगिरीची माहिती दिली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गर्गेलवार, डॉ. भारत, डॉ. चटकी व डॉ. येडे यांनी विचार मांडले.  

सोमय्यात आजही होणार लसीकरण
मिशन युवा स्वास्थअंतर्गत १८  वर्षांपुढील  विद्यार्थ्यांना सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी  १०. ३० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत कोविड लस देण्यात येणार आहे. स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम मोलाचा असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष  आंबटकर, अंकिता आंबटकर आदींनी केले. उपक्रमासाठी रजिस्ट्रार बिसेन, प्रा. नागराळे, प्रा. पोहनकर, प्रा. आंबटकर, प्रा. बाबारे,  प्रा. धनश्री कोटकर,  प्रा. सोंडवले व शिक्षक  व  शिक्षेकतर कर्मचारी  सहकार्य करीत आहेत.

 

Web Title: Kovid vaccination team for students reached the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.