कोल्हापुरची दंगल सरकार पुरस्कृत; उत्तरप्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 07:24 PM2023-06-08T19:24:19+5:302023-06-08T19:24:51+5:30

Chandrapur News कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Kolhapur riot government sponsored; Maharashtra ranks second in crime after Uttar Pradesh | कोल्हापुरची दंगल सरकार पुरस्कृत; उत्तरप्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

कोल्हापुरची दंगल सरकार पुरस्कृत; उत्तरप्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

googlenewsNext


चंद्रपूर : कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक व्हीडीओ सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारचे देण असल्याचे म्हटले आहे. तर विदर्भातील तरूणीची मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतीगृहात झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. उत्तर प्रदेशानंतर गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशीही टीका वडेट्टीवार यांनी केली.


कोल्हापूरचा राडा नियोजित आहे. या राड्याच्या संदर्भात सरकारकडे बोट निश्चित पणे जाईल हे खात्रीपूर्वक आम्ही सांगू शकतो. राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये या सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्यानंतर व निवडणूकीबाबतचे सर्व सर्वेक्षण विरोधात गेल्यानंतर सरकारने आता राज्यात जातीय तेढ निर्माण करणे, जातीय तणाव निर्माण करणे, दंगली, राडे तयार करून हिंदू मुस्लीम मध्ये तेढ निर्माण करून स्वत:च्या सत्तेची पोळी भाजण्याचे काम यांनी सुरू केले आहे. याचाच परिपाक कोल्हापूरची घटना आहे असे ते म्हणाले. 

 या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या सरकारने विश्वास गमावला आहे. सरकारने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. जसजशा निवडणूका जवळ येईल तस तशा जातीय दंगली, धार्मिक व्देश वाढविण्याचे काम केले आहे. हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याशिवाय या सरकारसमोर दुसरा मार्ग नाही, मतांचे विभाजन करून निवडून येण्याशिवाय दुसरा पर्यांय या सरकार समोर नाही, सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. सरकार कुठलेही काम करित नाही. अशा परिस्थितीत सरकारने दंगली करा, तेढ निर्माण करा, जातीय तणाव तयार करा आणि मते घ्या व सत्तेत असेच पाऊल सरकारने टाकले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता या सरकारला माफ करणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

तसेच मुंबई वसतीगृहात झालेली घटना ही दुर्देवी आहे. उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकार स्वत:च्या सुरक्षेसाठी लढत आहे, त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवूच शकत नाही. विदर्भाची ही कन्या आहे, शिक्षणासाठी गेलेल्या मुलीला या पध्दतीने अत्याचार होत असेल तर व जीव गमवावा लागत असेल तर कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेला नाही, सरकारचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीवर राहिला नाही, स्वत:च्या आमदार, खासदार व मंत्र्यांवर या सरकारचा धाक राहिला नाही. तेव्हा गुन्हेगारांवर कसा धाक राहिल असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नालायक सरकार राज्यातून घालविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तरूणीचा विषय विधीमंडळात लावू, याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर लढत राहू, झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे, सरकारला थोडी तरी या प्रकरणी चिंता करायची गरज आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Kolhapur riot government sponsored; Maharashtra ranks second in crime after Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.