डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लील नृत्य; मोहाडी तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 10:38 AM2022-12-02T10:38:19+5:302022-12-02T10:41:11+5:30

व्हिडीओ व्हायरल होऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई नाही

obscene dancing in the name of Dance Hungama; video of Mohadi taluka goes viral | डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लील नृत्य; मोहाडी तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल

डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लील नृत्य; मोहाडी तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल

Next

भंडारा : झाडीपट्टीत दिवाळीनंतर गावागावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. लोककलेचा वारसा असलेल्या या उत्सवात आता काही गावांमध्ये डान्स हंगामाचा धुमाकूळ सुरू झाला असून बाहेरगावाहून आणलेल्या नृत्यांगनासोबत अश्लील नृत्य केले जात आहे. असाच प्रकार मोहाडी तालुक्यातील एका गावातील डान्स हंगामात झाला असून त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मोहाडी तालुक्यातील एका गावात नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. बाहेरगावाहून नृत्यांगनांना पाचारण करण्यात आले होते. गावात मंडप टाकून डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र, काही वेळातच या डान्स हंगामाचा ताबा मद्य प्राशन करून असलेल्या तरुणांनी घेतला. हातात दारूच्या बाॅटल घेऊन तोकड्या कपड्यात असलेल्या तरुणींसोबत नृत्य करण्यात आले. यावेळी कुणीतरी या नृत्याचा व्हिडीओ काढला. दोन दिवसांपूर्वी तो व्हिडीओ तुमसर तालुक्यातील एका ग्रुपवर व्हायरल झाला. त्यात काही तरुण अश्लील नृत्य करताना दिसत आहेत.

पोलिस अनभिज्ञ

डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लील नृत्य होण्याचा प्रकार आता नवीन नाही. मात्र, या सर्व प्रकारापासून पोलिस अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. मोहाडी तालुक्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. आताही काही गावांमध्ये असे डान्स हंगामाचे कार्यक्रम सुरू असल्याची माहिती आहे. महिन्याभरापूर्वी भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे डान्स हंगामात तुफान हाणामारीची घटना घडली होती. मोहाडी तालुक्यातही डान्स हंगामात गोंधळ झाला होता. परंतु, पोलिसांनी या डान्स हंगामा पार्टीवर कोणतीही कारवाई केली नाही.

Web Title: obscene dancing in the name of Dance Hungama; video of Mohadi taluka goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.