'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 03:41 PM2023-06-03T15:41:23+5:302023-06-03T15:50:48+5:30

"अनेक नेते राजकारणात हरले त्यांना संधी देण्यात आले. पण, मला संधी देण्यात आली नाही."

'I will not stop, I will not stoop Pankaja Munde announced the role | 'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

googlenewsNext

गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उघडं नाराजी व्यक्त केली होती, आज स्व. गोपीनाथ मुंडे यांची स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान आज पंकजा मुंडे कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,  राजकारणात मला जे अनुभव आले. पण, गेल्या पाच वर्षातील अनुभव खूप अनोखे आहेत. माझं मत माध्यमांनी माझ्या माणसांपर्यंत पोहोचवलं. मी माझ्या लोकांसाठी लढणार, मी थांबणार नाही. झुकणार नाही, असंही मुंडे म्हणाल्या. 

"भाजपाला संधिसाधू जवळचे, पंकजा मुंडे माझ्यासारखे दूरचे"; एकनाथ खडसेंची खदखद बाहेर

"आम्ही स्मरण करुन गोपीनाथ मुंडेंच वाक्य आठवलं तर एकच वाक्य ऐकू येतं ते म्हणजे, मी थांबणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. या नंतर हे वाक्य हजारो वर्ष उच्चारल तरीही या वाक्याच महत्व कमी होणार नाही. कुणाला धमकावण्यासाठी, इशारा करण्याची गरज नसते. ज्याला इशारा करायचा असतो तिथपर्यंत ते जात असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

'मी राजकारणात फक्त लोकांसाठी आहे, मी माझ्या परिवाराचे भलं करण्यासाठी राजकारणात नाही.मला ज्यावेळी भूमिका घ्यायची असेल तेव्हा मी तुम्हालाच भगवानगडावर बोलावून तुमच्या समोर भूमिका घेईन, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी यावेळी मांडली. 

'कुणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन बंदुक चालवणार एवढे खांदे मला मिळाले नाही, मात्र माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करतात.पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोक भूमिका घेईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

"अनेक नेते राजकारणात हरले त्यांना संधी देण्यात आले. पण, मला संधी देण्यात आली नाही. मी माझे नेते अमित शाह यांना भेटणार आहे, मी त्यांच्याकडे वेळ मागीतली आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Web Title: 'I will not stop, I will not stoop Pankaja Munde announced the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.