वेरूळ घाटात टेम्पोचा अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 05:02 PM2022-08-14T17:02:10+5:302022-08-14T20:43:24+5:30

औरंगाबाद जवळील वेरूळ घाटात टेम्पोचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Tempo accident at Verul Ghat aurangabad; One dead and six injured | वेरूळ घाटात टेम्पोचा अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी

वेरूळ घाटात टेम्पोचा अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी

googlenewsNext

खुलताबाद: औरंगाबाद जवळील वेरूळ घाटात टेम्पोचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकजण ठार झाला असून, 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जातेगाव येथील मोठ्या महादेवाला युवकांना घेऊन हा टेम्पो आज जात होता. दुपारी ३:३० वाजता वेरूळ घाटातील चांगोबा वळणावर  टेम्पो पलटी झाला. 

नांदगाव तालुक्यातील पिनाकेश्वर येथील मोठा महादेव मंदिराला वेरूळ  येथील शिवालय तीर्थकुंडातून पाणी घेऊन जाण्यासाठी गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील तरुणयुवक टाटा टेम्पो क्रमांक एम एच 42 बी 39 79 मधून वेरूळ येथे जात होते. सदरील टेम्पो वेरूळ घाटातील चांगोबा वळणावरून  जात असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो घाटामध्ये दोन पलटी खात कोसळला. या मार्गावरून जाणारे व हा अपघात प्रत्यक्षदर्शी पाहणारे धामणगाव चे माजी सरपंच बंडू शिंदेचा सोमनाथ आबा तुरेवाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरमे यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेतली अन्य अन्य नागरिकांच्या मदतीने त्यांनी खाजगी वाहनातून अपघातातील जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या ठिकाणी डॉक्टर एच एस मरमट यांनी संतोष ताराचंद चरभरे (32) राहणार सावखेडा तालुका गंगापूर यास तपासून मयत घोषित केले, तर या अपघातात अन्य जखमी झालेले कन्हैया किशन चरभरे (वय 32 वर्ष ) इमरान इसाक शेख ( 26 ) दीपक अशोक कान्होले  (30)  हिरामण मच्छिंद्र मोरे ( 40 ) अशोक दिगंबर वाडे ( 32 ) लक्ष्मण पन्नालाल परसैया (30)  दत्तात्रय पापीनाथ (30)  सोमनाथ दामोदर ठोकळ ( 19 ) प्रसाद सुरेश उचित ( 24 ) संदीप सुभाष रावते वय 40 वर्ष अशोक अमरसिंग  सुरभैय्या   ( 45 ) सुरज सखाराम  ( 27)  गोविंद कृष्णा ठोकळ ( 26) वर्ष या जखमींवर डॉक्टर एच एस मरमट, परिचारिका छाया पंडित रामकिसन मोरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकांमधून तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले.

Web Title: Tempo accident at Verul Ghat aurangabad; One dead and six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.