..तर अकाेला मनपातील सदस्यसंख्या हाेणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 12:20 PM2022-08-04T12:20:00+5:302022-08-04T12:20:21+5:30

Akola Municipal Corporation : राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे.

..then the number of members in Akela Municipality will be less | ..तर अकाेला मनपातील सदस्यसंख्या हाेणार कमी

..तर अकाेला मनपातील सदस्यसंख्या हाेणार कमी

Next

- आशिष गावंडे

अकाेला : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना, आरक्षण साेडत व प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असतानाच बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकाेला मनपातील सदस्यसंख्या कमी हाेणार असल्याने प्रभागरचनेतही फेरबदल हाेण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एका प्रभागात तीन यानुसार बहुसदस्यीय प्रभागरचनेला मंजुरी दिली हाेती. तसेच दर दहा वर्षांनंतर हाेणारी जनगणना २०२१ मध्ये न झाल्यामुळे वाढीव लाेकसंख्येचा निकष ध्यानात घेत महापालिकांमधील सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला हाेता. सन २०१७ मध्ये पार पडलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली हाेती. ८० सदस्यांची संख्या गृहीत धरून एका प्रभागात चार यानुसार २० प्रभाग निश्चित केले हाेते. दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अकाेला मनपात ११ सदस्यांची संख्या वाढून ती ९१ झाली आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०११मधील जनगणनेच्या आधारे महापालिकांमधील सदस्यसंख्या गृहीत धरण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यामुळे पुन्हा एकदा सदस्यांची संख्या कमी हाेण्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे. या निर्णयामुळे नगरसेवक पदाचे इमले रचणाऱ्या इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

अधिसूचनेकडे लागले लक्ष

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा आधार घेत यासंदर्भातील अधिसूचना राज्यपालांकडे मंजुरीसाठी जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर निवडणूक आयाेगाकडे गेल्यावर महापालिकेला निर्देश प्राप्त हाेतील, अशी माहिती मनपातील निवडणूक विभागप्रमुख अनिल बिडवे यांनी ‘लाेकमत’ला दिली. त्यामुळे सर्वांचे लक्ष अधिसूचनेकडे लागले आहे.

Web Title: ..then the number of members in Akela Municipality will be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.