विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 10:48 AM2022-12-09T10:48:29+5:302022-12-09T10:49:50+5:30

मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले.

Students' rickshaw overturns, driver with 10 children injured; Locals running around in akola patur | विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

Next

राहुल सोनाने

अकोला/वाडेगाव:- जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस ते तुंलगा रस्त्यावर शुक्रवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान माऊली वाटिका जवळ सांगोळा येथून विद्यार्थ्यांना वाडेगाव येथे शाळेत घेऊ जात असताना विद्यार्थ्यांचे वाहन (आटो) पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
     
मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले. यामधील जवलापास १० ते १२ विद्यार्थी यांचा अपघात घडल्याचा प्रकार उपस्थित लोकांनी सांगितला आहे. ही घटना सकाळी पोलिसांची तयारी करीत असणारे युवा प्रतीक गवई, सम्राट गवई, मेजर विशाल लहाने, अतुल गवई, राज चिकटे, अभि चिकटे, प्रदीप टिकार, गौरव दाबेराव,  हृतिक गवई, अजय गवई, कपिल गवई, शुभम ताले, आदींच्या नजरेस पडताच त्यांनी धावाधाव करून जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना उचलून तत्काळ त्यांना नजीकच्या वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता गायगोळ यांनी प्राथमिक उपचार करून काहींना घरी पाठविले तर चालक व २ विद्यार्थी यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे..

Web Title: Students' rickshaw overturns, driver with 10 children injured; Locals running around in akola patur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.