मागास घटकांना अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ द्या; स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या !

By संतोष येलकर | Published: March 25, 2023 05:33 PM2023-03-25T17:33:57+5:302023-03-25T17:34:11+5:30

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

Provide benefits of financial assistance schemes to the backward elements; Provide self-employment opportunities! | मागास घटकांना अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ द्या; स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या !

मागास घटकांना अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ द्या; स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या !

googlenewsNext

अकोला: समाजातील मागास घटकांना विविध प्रकारच्या अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या आणि मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शनिवारी येथे दिले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच पोलीस विभागातर्फे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल प्रकरणांची माहिती सादर करण्यात आली.

मागास घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध बॅंकांमार्फत व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून, कोणतेही प्रकरण विनाकारण प्रलंबित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी आणि यासंदर्भातील कार्यवाही १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करुन आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देशही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले. अनुसूचित जाती बहुल वस्त्यांमध्येही विकासकामे प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिल्या.

Web Title: Provide benefits of financial assistance schemes to the backward elements; Provide self-employment opportunities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.