९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

By Atul.jaiswal | Published: March 29, 2023 06:01 PM2023-03-29T18:01:08+5:302023-03-29T18:01:33+5:30

अकोल्यासह विविध रेल्वेस्थानकांवर एक दिवसाची माेहीम : विनातिकीट प्रवाशांकडून १५ लाखांचा दंड वसूल

As many as 2,478 'free' found in 94 railway trains; 15 lakh fine recovery | ९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

९४ रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल २,४७८ ‘फुकटे’; १५ लाख दंड वसुल

googlenewsNext

अकोला : विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना जरब बसावी या हेतूने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने बुधवारी विभागातील अकोल्यासह मोठ्या रेल्वेस्थानक व अप आणि डाऊन मार्गावरील ९४ रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या २,४७८ प्रवाशांवर कारवाई करत १५ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व आरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव सेक्शनमध्ये वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ९४ गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दोन अधिकारी, तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या ४७ चमूंनी सहकार्य केले.

रेल्वेत प्रवास करताना योग्य ते तिकीट घेऊन ज्या श्रेणीचे तिकीट आहे त्याच श्रेणीच्या डब्यात प्रवास केला पाहिजे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास नको असेल तर प्रवाशांनी युटीएस ॲपचा वापर करावा.
- शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

Web Title: As many as 2,478 'free' found in 94 railway trains; 15 lakh fine recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.